Document Actions


मधुमेह

मधुमेह या व्याधीमधे शरीर पुरेशा प्रमाणात इन्शुलिन तयार करु शकत नसल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण बरंच वाढतं.  इन्शुलिन हा एक संप्रेरक असून तो स्वादुपिंडाद्वारे तयार करुन सोडला जातो.  इन्शुलिन हे रक्तातील साखर नियंत्रित करते.  

मधुमेहाचे प्रकार

मधुमेह असलेल्या मुलाच्या रक्तात साखरेचं प्रमाण अधिक असतं, याचं एक कारण म्हणजे स्वादुपिंड कमी प्रमाणात इन्शुलिन तयार करतं किंवा इन्शुलिनच तयार करत नाही (टाईप-एक मधुमेह, पूर्वी याला लहान मुलांचा मधुमेह म्हणत) किंवा तयार केल्या जाणा-या इन्शुलिनच्या प्रमाणाबाबत शरीराला संवेदना नसते (टाईप दोन मधुमेह).  टाईप-एक मधुमेह हा लहानपणात केव्हाही होऊ शकतो, अगदी अर्भकावस्थेतसुध्दा परंतु तो सामान्यतः वयाच्या ६व्या आणि १३व्या वर्षात सुरु होतो.  टाईप दोन मधुमेह प्रामुख्यानं पौंगंडावस्थेत होतो परंतु वजनानं अधिक आणि लठ्ठ मुलांमधेही मोठ्या प्रमाणात दिसून येऊ लागला आहे.

टाईप दोन मधुमेह होण्याचा धोका कोणत्या मुलांना असतो ?

पुढील निकष पूर्ण करणा-या मुलांची रिकाम्या पोटी रक्तातील साखर वयाच्या १०व्या वर्षापासून दर २ वर्षांनी तपासावी

  • अतिशय वजन असणं (त्याच वयाच्या, लिंग आणि उंचीच्या मुलांच्यापेक्षा ८५ टक्के अधिक वजन असणं)
  • टाईप दोन मधुमेहाचा नजिकचा विकार असणं
  • उच्च रक्तदाब, मेदाची रक्तातील पातळी उच्च असणं

पौंगडावस्था आणि मधुमेह

पौंगडावस्थेतील मुलांना पुढील कारणांमुळं त्याच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यात समस्या येतेः

  • वयात येताना हार्मोन्समधील बदल
  • पौंगडावस्थेतील जीवनशैली, मित्रांचा दबाव, वाढलेली कामं, अनियमित वेळापत्रक, शरीराच्या प्रतिमेबद्द्ल चिंता वाटणं किंवा खाण्यापिण्याची समस्या
  • मद्यपान, सिगारेट्सची सवय

लक्षणे

टाईप एक मधुमेहाची लक्षणं लगेच विकसित होतात, सामान्यतः दोन ते तीन आठवड्यात किंवा कमी काळात आणि ती सहजपणे दिसतात.  रक्तातील उच्च साखरेमुळं त्या मुलाला वारंवार लघवी लागते. शरीरातील द्रवपदार्थ कमी झाल्यानं तहान वाढते आणि द्रवपदार्थ पिण्याचं प्रमाण वाढतं.  काही मुलांना अतिसार होतो त्यामुळं अशक्तपणा, आळस येतो आणि नाडी जलद चालते. दृष्टी अंधुक होऊ शकते. 

टाईप दोन मधुमेह असलेल्या मुलांमध्ये लक्षणं ही टाईप एक मधुमेहींपेक्षा कमी तीव्र असतात आणि संथगतीनं विकसित होतात – काही आठवडे किंवा अगदी काही महिन्यांनी.  मुलाची तहान आणि लघवीची भावना वाढली आहे किंवा थकवा येणं यासारखी अस्पष्ट लक्षणं पालकांना दिसू शकतात.  सामान्यतः टाईप दोन मधुमेह असलेल्या मुलांना तीव्र अतिसार होत नाही.





Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

This site conforms to the following standards: