सुंता
मुलांच्या शीश्नावर त्वचेची एक टोपी असते, त्याने टोक झाकले जाते. सुंता करतेवेळी ही वरची त्वचा शस्त्रक्रियेनं काढली जाते त्यामुळं शीश्नाचं टोक उघडं होतं.
- जन्मानंतर दोन ते तीन आठवड्यांनी मुलाची सुंता करणं चांगलं कारण मुलगा मोठा होत जातो तसं सुंता करणं अवघड होतं. परंतु ही प्रक्रिया पहिल्या दहा दिवसांमधे केली जाते (ब-याचदा पहिल्या ४८ तासांमधे).
- लवकर जन्मलेल्या किंवा अन्य गुंतागुंत असलेल्या बाळांची ते रुग्णालयात बाहेर पडत नाहीत तोवर सुंता करण्याची गरज नाही.
- ज्या बाळांना जन्मतःच शीश्नाची विकृती आहे आणि त्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे अशा मुलांची सुंता केली जात नाही कारण ती त्वचा भरुन काढण्याच्या कामी येते.
सुंता केलेल्या शीश्नाची निगा
- अंघोळीच्या वेळी साबण आणि पाण्याने ते स्वच्छ धुवा.
- सुंता केल्यानंतर बाळाला थोडी अस्वस्थता जाणवू शकते त्यामुळं काळजी घ्या.
- सुंता केलेल्या ठिकाणी मलमपट्टी असेल तर आवश्यकतेनुसार ती बदला.
- सुंता बरी होण्याला सामान्यतः सात ते दहा दिवस लागतात. तोवर शीश्नाचे टोक खडबडीत किवा पिवळ्या रंगाचं दिसू शकतं. पुढील स्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- सतत रक्तस्त्राव
- शीश्नाच्या टोकाला लालसरपणा जो तीन दिवसांनंतर आणखी वाढतो
- ताप
- संक्रमणाची चिन्हें, जसे, पू भरलेले फोड
- सुंता केल्यानंतर ६ ते ८ तासांनी देखील सामान्यपणे लघवी न होणे

